Latest review from Data Guru
मातोश्री सावित्रीबाई फुले यांच्या जन्मांदिनी ३ जानेवारी १९९० रोजी संस्थेने बालविकास मंदिराची स्थापना अवघ्या ६ मुलांवर रेणुका नगर येथे केली .
आज संस्थेचे मातोश्री सावित्रीबाई फुले बालविकास मंदिर, मातोश्री सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यामंदिर, मातोश्री सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, गुरुवर्य मोतीराम सोंडाजी शिंदे कॉमर्स जुनिअर कॉलेज आणि सहकार महर्षी गोविंदराव (नाना) सोनवणे इंग्लिश मेडीयम स्कूल या सर्व शाखा पखाल रोड, द्वारका, नाशिक येथे संस्थेच्या स्वमालकीच्या ६००० चौ.मी. जागेत भव्य तीन माजली इमारतीत सुरु आहेत. वेळोवेळी आवश्यक त्या गरजा लक्षात घेऊन संस्था आपल्या सर्वांचे सहकार्य आणि मार्गदर्शनाने पूर्ण करीत आहे.