Latest review from सुनिल जांगळे Sunil Jangale
टॉयलेट बाथरूम ची अवस्था नरकासारखी - स्वछता नाहीच यास्तव- 0 मार्क
अधिक बील देणे ( जनरल वॉर्ड मध्ये असताना स्पेशल वॉर्ड बिलमध्ये दाखवणे) त्यामुळे - 0 मार्क
पेशन्टला खराब असलेल्या ऑक्सिमीटरने चेक करून त्यानुसार उपचार करणे- पेशन्ट मेला त्यामुळे शून्य मार्क.
भरमसाठ मेडिकल लिहून देणे आणि मेडिकल बील अधिक वाढ कशी होईल ते पहाणे.
हॉस्पिटलसमोर पार्कींग व्यवस्था नाही.
नगरपरिषद जागेत/ रस्त्यावर कचरा व बांबू टाकले असल्याने अडथळा होत आहे.
पेशन्ट नातेवाईकांना पिण्यास पाणी नाही, अंघोळ सोय नाही.
प्रॉपर माहिती व सहकार्य नाही.
पैसा कमावणे हाच उद्देश..... रुग्ण सेवेपेक्षा पेशाला अधिक महत्व....त्यामुळे शून्य गुण.
फक्त स्टाइल्स, फर्निचर, हॉस्पिटल इमारतीस रंगरंगोटी म्हणजे चांगले हॉस्पिटल नव्हे.