Latest review from सतीश समर्थ
माझी मुलगी प्रज्ञा ही स्मिताताई यांच्या कथ्थक वर्गात जात होती; अजूनही इच्छा आहे, पण काही अगदी वैयक्तिकरीत्या कारणास्तव मी तिला वर्गात पाठवू शकलो नाही. स्मिता या माझ्यापेक्षा खूप लहान असल्या तरी त्यांचं नाव ऐकताच प्रज्ञा आपल्या कानाला स्पर्श करते. गुरूचे नाव घेताना त्यांचा आदर, मान कसा ठेवावा, हे मला तिच्याकडूनच कळले. स्मिता या संवेदनशील मनाच्या, भेदभाव न पाळणाऱ्या, आपला अभ्यास अगदी मन:पूर्वक विद्यार्थ्यांकडून करवून घेणा-या शिक्षक आहेत. त्यांच्या कार्याला सुयश मिळो, हीच माझ्या सद्गुरूचरणी नम्र निवेदन. धन्यवाद ं